|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी आजही स्वर्गच : अमेरिका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पाकिस्तानदहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित देश असल्याचे अमेरिकन सरकारने आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. अमेरिकेच्या सरकारनं ’कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम 2017’ या नावानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगसमोर आला आहे. पाकिस्तान सरकारकडून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांवर योग्य कारवाई केला जात नाही. त्यामुळेच या संघटना भारतात हल्ले करतात, अशा शब्दांमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया धोरणावर भाष्य केलं आहे.

 

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्मया आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईड असलेल्या हाफिज सईदचा उल्लेख या अहवालात आहे. ’हाफिज सईदला जानेवारी 2017 मध्ये ताब्यात घेण्यात आलं. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये त्याची सुटका झाली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या संघटना अगदी उघडपणे लोकांकडून निधी गोळा करतात, तरुर्णंची भरती करतात, त्यांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षण देतात. मात्र पाकिस्तान सरकारने याला कोणताही लगाम घातलेला नाही’, असे अमेरिकेने अहवालात म्हटले आहे.

 

Related posts: