|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » एकटय़ा मुलींना हेरून बलात्कार, वसईत सीरियल रेपिस्टची दहशत

एकटय़ा मुलींना हेरून बलात्कार, वसईत सीरियल रेपिस्टची दहशत 

ऑनलाईन टीम / वसई :

वसई, विरार आणि नालासोपाऱयात एका सीरियल रेपिस्टची दहशत पसरली आहे. हा नराधम एकट्या अल्पवयीन मुलींना हेरुन घरात घुसतो आणि त्यांच्यावर बलात्कार करतो. त्यामुळे तुमच्या आसपास तो फिरताना दिसला, तर ताबडतोब पोलिसांना कळवा.

 

आधी नवी मुंबई, मग ठाणे आणि नंतर पालघरमध्ये धुमाकूळ घालून हा नराधम आता वसई विरारमध्ये आला आहे. त्यामुळे वसईतील पालकांनो डोळय़ात तेल घालून आपल्या चिमुरडींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

 

25 ते 35 वर्ष वयोगटातील वाटणारा हा तरुण कदाचित तुमच्या परिसरातही फिरत असेल. एखाद्या शांत घराचा अंदाज घेऊन हा दार ठोठावतो. एखाद्या लहान मुलीने दरवाजा उघडला, की तो भावनिक जाळं फेकतो.तुझ्या वडिलांनी तुला बोलावलं आहे’ हे सभ्यपणे कारणासहित पटवून देण्यात हा माहीर आहे. यालाच फसून गेल्या चार दिवसात दोन चिमुरड्या मुली या नराधमाच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या.वडिलांचं नाव सांगून हा लहान मुलींना एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जातो आणि मग आपलं खरं रुप दाखवतो. जीवे मारण्याची धमकी देऊन चिमुरडींवर बलात्कार केल्याचे दोन गुन्हे तुलिंज पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.