|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

सूर्य, हर्षल षडाष्टक योग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गिऱहाईकांबरोबर वाद वाढवू नका. नोकर चाकरांना सांभाळून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या हितासाठी कार्य करा. त्यांची कला पाहून तुमचे विचार व्यक्त करा. नोकरीत वरि÷ांचा सल्ला घ्या. अनधिकृत कोणतेही कृत्य टाळा. तुमच्यावर आरोप येऊ शकतो. घरातील कामे होतील. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुमचा प्रभाव वाढेल. मंगळवार, बुधवारी अडचणी येतील. कायदा पाळा.


वृषभ

बुध, मंगळ त्रिकोण योग, सूर्य, मंगळ त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. लोकांच्याकडून तुमच्याबद्दल नाराजीचा सूर निघण्याची शक्मयता आहे. गुरुवारी, शुक्रवारी कोर्टाच्या कामात अडथळे येतील. घरातील वाद वाढू शकतो. वाटाघाटीत तंटा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनतीने यश मिळेल. परीक्षेसाठी कष्ट घ्या. संगत चांगली ठेवा.


मिथुन

रवि, मंगळ त्रिकोण योग, चंद्र, गुरु प्रतियोग होत आहे. सर्वच ठिकाणी तुमची कामे करून घेता येतील. जमिनीच्या व्यवहारातील समस्या कमी होईल. घर, वाहन, दुकान खरेदीची संधी मिळेल. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची योजना पूर्ण करून दाखवा. बुद्धिचातुर्याने वागा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस लवकर संपवणे महत्त्वाचे आहे. परीक्षेत चांगले यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.


कर्क

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणतीही समस्या वाढू शकते. वाहन जपून चालवा. दुखापत होईल. जास्त गर्दीत जाऊ नका. वस्तू सांभाळा.  सूर्य, मंगळ त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांच्या गरजा ओळखा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात वाढ होईल. आर्थिक मदत गोळा करून महिलांसाठी काम करा. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक होईल. कोर्टकेसमध्ये यश मिळू शकेल.


सिंह

चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांना तुमचे नेतृत्व मान्य असेल. कार्यतत्परता दाखवा. सोमवार, मंगळवार धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. कोर्टकेसमध्ये अडथळे येऊ शकतात. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळवा. थकबाकी वसूल करा. संसारात शुभ समाचार मिळेल. विवाहासाठी स्थळे येतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रभाव वाढेल. नवीन मैत्री होईल. परदेशात जाता येईल. नोकरी लागेल.


कन्या

 अनंतचतुर्दशीच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. हा आठवडा समस्या वाढवणारा ठरू शकतो. कुठेही अरेरावी करू नका. कायद्याचे बंधन लक्षात ठेवा. धंद्यात वाद वाढवू नका. फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात एखादा मुद्दा तुम्हाला न पटणारा असेल. व्यसनाने नाव बिघडू शकते. मित्र मदत करतील. कोर्टकेसमध्ये नम्रता ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. किरकोळ गैरसमज होऊ शकतो. भ्रमात राहू नका.


तुळ

 रवि, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. मंगळवार, बुधवार कोर्टकेसमध्ये अडथळे येतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात धोका संभवतो. धंद्यात आळस करू नका. सौम्य शब्दात तुम्ही गिऱहाईकाबरोबर, मालकाबरोबर वागा. नोकरीत गैरव्यवहार टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टिका होऊ शकते. तुमच्या मागे गैरसमज करून दिला जाईल. हे सर्व थोडय़ा कालावधीसाठी असेल. कुठेही नम्रतेने वागा व बोला. स्पर्धेत कष्ट घ्या.


वृश्चिक

चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, मंगळ त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे कार्य करा, निर्णय घ्या. धंद्यात काम मिळेल. थकबाकी मिळवा. संसारात किरकोळ नाराजी होईल. सप्ताहाच्या शेवटी कटकटी वाढतील. तुम्हाला विरोध सहन करावा लागेल. अनाठायी पैसा खर्च करू नका. मैत्रीत नाराजी होऊ शकते. महत्त्वाची वस्तू सांभाळा. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण असेल.


धनु

साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. सूर्य, मंगळ त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम करून घेता येईल. नवे कंत्राट मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल. विवाह जमू शकतो. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. योजना पूर्ण करा. पुढील कठीण काळासाठी आताच प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल. कोर्टकेस संपवा. नोकरीत चांगला बदल होईल.


मकर

बुध, मंगळ त्रिकोण योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुमच्या सामाजिक कार्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करता येईल. नावलौकिक वाढेल. राजकीय क्षेत्रात लोकांना तुमचा आधार वाटेल. धंद्यातील अडचणी कमी होतील. धंद्यात जम बसेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख होईल. नोकरीचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात चांगली घटना घडेल. परीक्षेत यश येईल. घरातील ताण कमी होईल.


कुंभ

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. या सप्ताहात महत्त्वाची कामे करून घ्या. रागावर ताबा ठेवा. सहनशीलता ठेवा. वादाची ठिणगी राजकीय, सामाजिक कार्यात पडू शकते. आरोप येईल. वाहन जपून चालवा. धंद्यात नुकसान टाळता येईल. गुप्त कारवाया वाढतील. आप्तेष्टांच्या, मित्रांच्या मदतीला जावे लागेल. धावपळ होईल. कला, क्रीडा क्षेत्रात टिकून रहा. परीक्षेसाठी चांगली तयारी करा.


मीन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाद होईल. मारामारीसारख्या प्रकरणात अडकू नका. दुसऱयाला मदत करतांना सत्य पडताळून पहा. धंदा मिळेल. उधारी वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. वरि÷ तुम्हाला बोलावतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेसमध्ये चांगला मुद्दा मिळेल. घरातील समस्या व वाद कमी होईल. खर्च मात्र वाढेल.