|Monday, December 10, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शिमल्यानजीक दरीत कोसळली जीप, 13 जणांचा मृत्यू

शिमल्यानजीक दरीत कोसळली जीप, 13 जणांचा मृत्यू 

शिमला

 हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे शनिवारी झालेल्या एका भीषण दुर्घटनेत 13 जण मारले गेल्याचे वृत्त आहे. शिमला येथील सनैल भागात एक जीप दरीत कोसळल्याने 13 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य काही जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर स्थानिक पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. हिमाचल प्रदेश-उत्तराखंड सीमेनजीक स्थित कुड्डू भागात जीप दुर्घटनाग्रस्त झाली आहे. हिमाचल प्रदेश येथून ही जीप उत्तराखंडसाठी रवाना झाली होती. वाटेत जुब्बलनजीक चालकाने नियंत्रण गमाविल्याने जीप दरीत कोसळल्याचे शिमला उपायुक्त अमित कश्यप यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर तहसीलदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पेलीस अधिकारी बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेचे शिकार झालेले सर्व जण हिमाचल प्रदेशच्या नंदला गावाचे रहिवासी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related posts: