|Monday, December 10, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हुमरमळय़ात कार उलटून अपघात

हुमरमळय़ात कार उलटून अपघात 

प्रतिनिधी / म्हापण:

सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्टकडे जाणाऱया पिंगुळी-पाट या मुख्य मार्गावरील हुमरमळा (वालावल)-बांधलेला आंबा येथील धोकादायक वळणावर साईडपट्टी नसल्याने व तेथे बाजूला सखल भाग असल्याने व्हॅगनार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ती रस्ता सोडून बाजूला जात उलटली. सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाला. होण्यावरच निभावले. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

ओरोस येथील चालक म्हापण येथे आपल्या व्हॅगनार कारसह गेले होते. परत ओरोसला जात असताना हुमरमळा-बांधलेला आंबा येथील वळणावर साईडपट्टी, रस्ता व वळण यांचा अंदाज न आल्याने कार रस्ता सोडून बाहेर गेली व कारला अपघात झाला. झाडाच्या बुंध्याला आदळून कार उलटली. सुदैवाने चालकाला गंभीर दुखापत झाली नाही. कारच्या डिकीतून तो बाहेर आला. नंतर त्याला उपचारासाठी कुडाळ येथे नेण्यात आले.

कार जेथे उलटली. तिथेच एक गुराखी गुरे उभा होता. दोन मिनिटांपूर्वीच तो तेथून बाजूला गेला. त्यामुळे अनर्थ टळला. अपघाताचे वृत्त समजताच हुमरमळा तसेच म्हापण येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात भाग घेतला.

Related posts: