|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » वॉर्नरचे शतक, स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक

वॉर्नरचे शतक, स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक 

वृत्तसंस्था / सिडनी

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी ठरल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातलेल्या आपल्या देशाच्या डेव्हिड वॉर्नर आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू प्रिमियर क्रिकेट लीग स्पर्धेत अनुक्रमे शतक आणि अर्धशतक नोंदवून क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे.

गेल्या मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयातील कसोटी मालिकेत वॉर्नर आणि स्मिथ यांनी चेंडू कुरडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वॉर्नर, स्मिथ आणि बँक्राँफ्ट या तीन खेळाडूंना दोषी ठरविण्यात आले होते. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर एक वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. गेल्या मार्चनंतर स्टीव्ह स्मिथचा हा पहिला सामना आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू प्रिमियर क्रिकेट स्पर्धेत रँडविक पीटरशेम आणि एनएसडब्ल्यू ब्ल्युज यांच्यात झालेल्या सामन्यात माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाबाद अर्धशतक झळकविले. स्मिथने 92 चेंडूत 85 धावा सुदरलँड संघाकडून खेळताना नोंदविल्या. सुदरलँड आणि मॉसमेन यांच्यात हा सामना खेळविला गेला. 50 षटकांत सुदरलँडने 238 धावा जमविल्या. सुदरलँडने हा सामना अखेर जिंकला.

या स्पर्धेतील रँडविक पीटरशेमा आणि सेंट जॉर्ज या दोन संघातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात रँडविक पीटरशेम संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार वॉर्नरने दमदार शतक झळकविले. त्याने नाबाद 155 धावा झोडपल्या.

Related posts: