|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » श्रींचे विसर्जन होणार कडक बंदोबस्तात

श्रींचे विसर्जन होणार कडक बंदोबस्तात 

प्रतिनिधी/ सोलापूर

 तब्बल दहा दिवसांच्या मुक्कामानंतर उद्या रविवारी शहरातील सार्वजनिक मंडळातील श्रींच्या मुर्तांची मिरवणुक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी शहर पोलिसांनी सोलापुरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी केली असून शहरात ठिकठिकाणी व विसर्जनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ‘वॉचटॉवर’ आणि ‘सीसीटीव्ही’ पॅमेऱयांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.

     शहर हद्दीतील एकून 8 मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सुमारे 333 मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. यासाठी तीन पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक   पोलीस आयुक्त, 27 पोलीस निरीक्षक, 79 सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक त्याचबरोबर 1 हजार 45 पोलीस कर्मचारी व 97 महिला पोलीस कर्मचारी यांच्यासह 260 पुरुष होमगार्ड, 92 महिला होमगार्ड व एक एसआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील महत्तवाच्या 46 ठिकाणी फिक्स पाँईट ठेवण्यात आले आहेत. यावर्षी श्रीउत्सव आणि मोहरम असे दोन्ही सण एकाच वेळी शहरात साजरे करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला. मोहरम सणाच्या निमित्ताने शहरातील विविध भागात स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकीत वॉच टॉवरवरुन लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच मिरवणुकी दरम्यान अत्यावश्यक सेवाही तत्पर ठेवण्यात आली आहे. त्यासाठी डॉक्टर, ऍम्बुलन्स, अग्निशमन या यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचेही आयुक्त तांबडे म्हणाले.

    दरम्यान, साधारण तीन केलो मीटर चालणाऱया लोकमान्य मध्यवर्ती मंडळाच्या विसर्जन मार्गावर सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे यांच्यासह 5 अधिकारी आणि 18 कर्मचारी असणार आहेंत.त्याचबरोबर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीसाठी पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त जिरगे यांच्यासह 6 अधिकारी व 78 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. पूर्व विभागासाठी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह 7 अधिकाऱयासह 95 पोलीस कर्मचारी बंदोबस्त करणार आहेत. त्याचबरोबर लष्कर मध्यवर्तीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सकळे यांच्यासह 8 अधिकारी आणि 80 कर्मचाऱयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विसर्जन मार्गावर पोलीस उपायुक्त डॉ. महावरकर, सपोआ दरेकर यांच्यासह 4 अधिकारी  व 55 कर्मचारी आणि स्ट्रायकिंग फोर्स असणार आहे. त्याचबरोबर होटगी रोड, घरकुल, निलम नगर व बाळे परिसरातील श्रींच्या विसर्जन मार्गावर तसेच विसर्जन स्थळी चोख बंदोबस्त तैनात केला गेला