|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लोकमान्य सोसायटी वडगाव शाखेतर्फे सभासद-खातेदारांचा वाढदिवस

लोकमान्य सोसायटी वडगाव शाखेतर्फे सभासद-खातेदारांचा वाढदिवस 

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी, वडगाव (श्रीहरी मंदिरसमोर) शाखेच्यावतीने सोसायटीच्या सभासद आणि खातेधारकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात असणाऱया सभासद आणि खातेधारकांचा वाढदिवस शनिवारी शाखेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी 92 वर्षीय ज्येष्ठ सभासद गंगाधर कामत यांचा खास सत्कार करण्यात आला.

लोकमान्यचे सभासद आणि खातेदार असणारे सुरेश कुलकर्णी, वर्षा नंद्याळकर, सुवर्णा चिल्लाळ, सुधा कल्लेद आदींचा वाढदिवस साजरा झाला. याप्रसंगी नारायण चिल्लाळ यांनी विचार मांडले. ‘लोकमान्य’च्या माध्यमातून किरण ठाकुर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. सोसायटीच्यावतीने सर्व सभासद आणि खातेधारकांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम करून सर्व सभासद आणि खातेधारकांना एकत्रित आणण्याचे काम होत असल्याचे चिल्लाळ यांनी सांगितले.

प्रारंभी शाखा व्यवस्थापिका रेवती जोशी यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक व्यवस्थापक दिनेश सांगेलिया यांनी स्वागत केले. लेखा साहाय्यक प्रसाद भट यांनी गिटारवादन आणि गायन केले. कार्यक्रमाला सोसायटीचे कर्मचारी शिवाजी धामणेकर, सुजाता बेडरे, प्रियांका पालेकर, मनोहर पाटील, परशराम लटकन आदी उपस्थित होते.