|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आज बाप्पांना निरोप….

आज बाप्पांना निरोप…. 

बेळगावकर विसर्जनासाठी सज्ज , दुपारी 4 वाजता सुरू होणार मिरवणूक

प्रतिनिधी / बेळगाव

गणपती बाप्पा रविवारी आपल्या गावाला परत जाणार आहेत. भाविकांच्या भक्तीभावाचा अनुभव घेतलेल्या आपल्या लाडक्मया बाप्पांच्या विसर्जनासाठी म्हणजेच निरोपाच्या सोहळय़ासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. विधायक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱया बेळगावात पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्मयांचा कमीतकमी वापर आणि वेळेत विसर्जन करुन बाप्पांबद्दलचा आदर राखला जाणार आहे.

पुणे-मुंबईनंतर लोकप्रिय असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक  विसर्जन मिरवणूक रविवारी निघणार आहे. सुबक मूर्ती, विविध मंडळांचे आकर्षक देखावे, वाद्यांचा गजर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यामुळे ही मिरवणूक लक्षणीय ठरणार आहे. गणेश भक्तीत तल्लीन झालेले भाविक अकराव्या दिवशी भक्तीभावाने गणपती बाप्पांचे विसर्जन करणार  आहेत.

येथील हुतात्मा चौकामध्ये रविवारी दुपारी चार वाजता महापौर बसवराज चिक्कलदिनी यांच्या हस्ते पहिल्या मानाच्या गणपतीचे पूजन करुन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, उपमहापौर मधुश्री पुजारी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एस. डी. बोम्मनहळ्ळी, पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, महापालिका आयुक्त शशिधर कुरेर हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे देण्यात आली.

विसर्जन मिरवणुकीचे वैभव

बेळगावच्या विसर्जन मिरवणुकीला आगळे महत्त्व आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातील गणेशभक्त एकच गर्दी करतात. तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील भाविकांची संख्या मोठी असते. वाजतगाजत होणारे बाप्पाचे विसर्जन पाहण्याचा आनंद अवर्णनीय असाच असतो. यामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढतच चालली आहे. भाविकांची संख्या जितकी मोठी तितकाच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. यामुळेच विसर्जन मिरवणुकीचे वैभव वाढत चालले आहे. यावषीही शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते.

डॉल्बीला फाटा

बेळगावच्या गणेशभक्तांनी मागील काही वर्षांपासून डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांवर भर दिला आहे. ढोल ताशांच्या गजरात श्री विसर्जन करण्याची विधायकता जपली जात आहे. याचबरोबरीने गणेशासमोर विविध मर्दानी खेळ सादर करण्याची परंपरा वाढीस लागत आहे. महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरातून दाखल होणारे लेझीम व इतर वाद्यांचे मेळे मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत असतात.  यंदाही विसर्जनाची मिरवणूक विविध आकर्षक आणि चित्तथरारक मर्दानी खेळांनी वैशिष्टय़ पूर्ण ठरणार आहे. अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करुन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

शांतता शिस्त पाळा

विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर काही मंडळींकडून अकारण गर्दी वाढवून धक्काबुक्की सारखे प्रकार केले जातात. बाप्पाच्या विसर्जनाच्या सोहळय़ावर याचा परिणाम जाणवतो. यासाठी कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत, याची दखल प्रत्येक मंडळाने व कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.

 

Related posts: