|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News » डीजे लावण्यावरून विश्वास नांगरे पाटील अन् उदयनराजे आमने – सामने

डीजे लावण्यावरून विश्वास नांगरे पाटील अन् उदयनराजे आमने – सामने 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कुणीही काहीही म्हटले तरी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार नाही. कुणी डीजे वाजवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. साताऱयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱयात डीजे लावणारच. कोण अडवडतो ते बघतो, असे विधान केले होते. याला नांगरे पाटलांनी नाव न घेता उत्तर दिले.

कुणालाही न जुमानता डॉल्बी लावणार असल्याचे उदयनराजेंनी जाहीर केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीजेला बंदी आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिह्यातील जिल्हाधिकाऱयांनी डीजे यंत्रणा स्वतःच्याच ताब्यात सील बंद आदेश यापूर्वीच पारित केले आहेत. त्यामुळे डीजे लावण्यासाठी बाहेर काढाल्यास पोलीस तात्काळ कारवाई करून जप्त करत आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी डीजेचे समर्थन करत गणेश मंडळांनी डीजे लावावा कोण अडवते पाहतो, असे विधान करत पोलिसांना आव्हान दिले होते. तर इकडे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता प्रति आव्हान देत डीजे लावणाऱयांवर गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले आहे.

Related posts: