|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News » सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या कल्पनाजींनी मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात सकाळी साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. त्या 61 वर्षांच्या होत्या.

ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहाय्यक निर्मात्या म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. प्रसिद्ध चित्रकार ललिता लाज्मी यांच्या त्या कन्या होत्या. तर, चित्रपट निर्माते गुरुदत्त हे त्यांचे मामा होते. भारतीय स्त्रीचे भावविश्व अगदी थेटपणे समाजासमोर मांडणाऱया अत्यंत संवेदनशील आणि तितक्मयाच प्रभावी निर्मात्या-दिग्दर्शक आणि सर्वोत्तम पटकथाकाकर त्या होत्या. जगप्रसिद्ध लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित ‘रुदाली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. या चित्रपटातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली. 2006 साली त्यांनी ‘चिंगारी’ या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मागील काही वर्षांपासून मुत्रपिंडाच्या कर्करोगाशी त्या झुंज देत होत्या.

Related posts: