|Monday, June 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर बनली लोकप्रिय स्त्री

श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर बनली लोकप्रिय स्त्री 

बॉलीवूडमध्ये सध्या स्त्री चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणाऱया या चित्रपटामुळे श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, स्त्री श्रद्धा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

गेले काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच गेले कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वत्र दिसत होती. पण, स्त्राr चित्रपटातल्या दमदार परफॉर्मन्समुळे श्रद्धाने प्रियंकालाही लोकप्रियतेत मागे सारलंय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. डिजीटल विश्वात सध्या श्रद्धा आणि प्रियंका चोप्राशिवाय सुई धागा चित्रपटामुळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमुळे राधिका आपटेचा चाहता वर्ग खूप आहे. तसेच मणिकर्णिका चित्रपटामुळे कंगना राणावतसुद्धा चांगलीच प्रसिद्ध आहे. मात्र, नंबर वन स्थानी पोहोचलेल्या श्रद्धाने 100 गुणांसह डिजीटल विश्वात या सर्व अभिनेत्रींना मागे टाकले आहे. डिजीटल लोकप्रियतेत श्रद्धानंतर प्रियंका चोप्रा 89 गुणांसह दुसऱया स्थानावर, अनुष्का शर्मा 36 गुणांसह तिसऱया जागी, राधिका आपटे 26 गुणांसह चौथ्या पदावर तर कंगना राणावत 23 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.