|Thursday, April 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नशीबवानच्या प्रमोशनला सुरुवात

नशीबवानच्या प्रमोशनला सुरुवात 

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाही असे म्हणतात. नुकतेच आगामी ‘नशीबवान’ चित्रपटाच्या टीमने देखील गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा अशा दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. ‘नशीबवान’मध्ये मुख्य भूमिका बजावणारा भाऊ कदमदेखील यावेळी हजर होता. बाप्पाकडे नशीबवान चित्रपटाच्या यशाचं साकडं घालण्यासाठी चित्रपटाची टीम पोहचली असताना जयवंत वाडकर यांनीदेखील प्रमुख उपस्थिती लावली होती.

 उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात भाऊ कदमच्या अभिनयाची एक वेगळीच छटा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात भाऊसोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे. चित्रपटाच्या निर्मिती फळीत अमित पाटील, विनोद गायकवाड आणि महेंद्र पाटील यांचे नाव असून प्रशांत मयेकर आणि अभिषेक रेणुसे यांनी सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या नशीबवान चित्रपटातून भाऊ कदम प्रेक्षकवर्गाला पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने भुरळ घालेल यात काही शंका नाही.

Related posts: