|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » पाच हजार कोटींचा चुना लावून आणखी एक व्यवसायिक परदेशात फरार

पाच हजार कोटींचा चुना लावून आणखी एक व्यवसायिक परदेशात फरार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं समोर आले आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे.नितीन संदेसरा आपला भाऊ चेतन, वहिनी दिप्तीबेन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नायजेरियाला पळून गेल्याचे सीबीआय आणि ईडीच्या सुत्रांकडून समोर आलं आहे. भारताचा नायजेरियासोबत कोणताही प्रत्यार्पण करार नसल्याने सध्या तरी नितीन संदेसरा याला भारतात आणणे शक्मय होणार नाही.

 

एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीन संदेसरा याला दुबईत ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आलं होतं. मात्र ही चुकीची माहिती आहे. त्याला कधीही दुबईत ताब्यात घेण्यात आलं नाही. तो आणि त्याचं कुटुंब त्याआधीच नायजेरियाला गेलं असल्याची शक्यता आहे’’

 

Related posts: