|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » Top News » युपी सरकारकडून साखर उद्योगांना 5535 कोटींची मदत

युपी सरकारकडून साखर उद्योगांना 5535 कोटींची मदत 

ऑनलाईन टीम / गोरखपूर :

शेतकऱयांनी भाजीपाल्याची शेती करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील ऊस शेतकऱयांना दिला होता. त्यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले होते, ऊस शेतकऱयांनी भाजीपाल्याची शेती करावी. कारण जास्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. आता त्याच योगी आदित्यनाथ यांनी साखर उद्योगाला 5 हजार 535 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

 

ऊस शेतीचं क्षेत्रफळ आणि उत्पादन वाढल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला योग्य भाव मिळत नाहीय. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकराने ऊसाच्या जागी भाजीपाला आणि इतर पिकांच्या शेती करण्याचा सल्ला दिला होता.मात्र, साखर कारखाने आणि शेतकरी यांच्या समस्या लक्षात घेऊन, योगी सरकारने आता साखर उद्योगाला 5 हजार 535 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.

 

उत्तर प्रदेश सरकारने साखरेच्या अत्याधुनिक उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरातील घट यांच्या धोक्मयापासून साखर उद्योगाला दिलासा देण्याचा निर्णय घेतला. सरकार साखर कारखान्यांना प्रति क्वटिंल खरेदीवर 4.50 रुपये अनुदान देणार आहे. त्याचसोबत, चार हजार कोटी रुपयांचे कर्जही दिले जाणार आहे. त्यामुळे ऊस शेतकऱयांना वेळेवर त्यांचा परतावा मिळेल आणि ते ऊसशेती अधिक जोमाने करु शकतील.

 

Related posts: