|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटोरोला वन पॉवर भारतात लाँच

मोटोरोला वन पॉवर भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / पुणे :

Motorola O हा Power भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची विशेषता म्हणजे स्नॅपड्रगन 636 प्रोसेसर, 5000 mAh क्षमतेची बॅटरी, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे मिळणार आहेत. या फोनला भविष्यात अँड्रॉईड अपडेटही मिळणार आहे. कंपनी म्हणून मोटोरोलाला मंगळवारी 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आगामी फोनसाठी कंपनीने गुगलशी भागीदारी केली आहे.

बाजारात Motorola O हा Power ची थेट टक्कर शाओमी रेडमी नोट 5 प्रो, असुस झेनफोन मॅक्स प्रो M1 आणि नोकिया 6.1 प्लसशी होणार आहे. लेनोव्होने Motorola O हा Power हा फोन सर्वात अगोदर आयएफए शो 2018 मध्ये लाँच केला तेव्हाच याबाबत माहिती समोर आली होती.

भारतीय बाजारात Motorola O हा Power ची किंमत 15999 रुपये आहे. या फोनचे एकच व्हेरिएंट असेल, जे चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजमध्ये असेल. 15 ऑक्टोबरपासून फोनची विक्री सुरु होणार असली तरी यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. हा फोन फक्त फ्लपिकार्टवर 15 ऑक्टोबरपासून मिळणार आहे.

Motorola O हा Power स्पेसिफिकेशन

अँड्रॉईड 8.0 सिस्टम, 6.2 इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले, ऑक्टा कोअर स्नँपड्रगन 636 प्रोसेसर, चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज, ड्युअल रिअर कॅमेरा (प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सेल, सेकंडरी सेन्सर 5 मेगापिक्सेल), 12 मेगापिक्सेल प्रंट कॅमेरा, 5000 mAh क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सिस्टिम.

Related posts: