|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही पाकिस्तानची इच्छा : भाजपा

राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही पाकिस्तानची इच्छा : भाजपा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राफेल डीलवरुन पंतप्रधन नरेंद्र मोदींवर वारंवार निशाणा साधणाऱया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आता भाजपाने टीका केली आहे. राहुल गांधींसाठी पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याच्या ट्वटिचा संदर्भ दिला.

 

पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी राहुल गांधींच्या ट्विटचा वापर केल्याचं संबित पात्रा म्हणाले. ’राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करणाऱया ट्विटचा आधर घेत आधी पाकिस्तानच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ट्विट केले. त्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. मोदी राहुल गांधींना घाबरले आहेत. राहुलच भारताचे पुढील पंतप्रधन असतील, असे पाकिस्तानचे माजी गृहमंत्री म्हणतात. त्यामुळे राहुल गांधींसाठी पाकिस्तानकडून निवडणूक प्रचार केला जात आहे, हे स्पष्ट होतं,’ असं संबित पात्रा म्हणाले.

 

Related posts: