|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मारहाणी प्रकरणी पाच जणांना अटक

मारहाणी प्रकरणी पाच जणांना अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

चार दिवसांपूर्वी उचगाव क्रॉसजवळ तुरमुरी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी सोमवारी काकती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

बाळकु लोकळू तेंगीनकर (वय 42), रामू शट्टू खांडेकर (वय 55), श्रीकांत दत्ता डोणकरी (वय 25), वैजू कृष्णा तेंगीनकर (वय 39), मारुती खाचू खांडेकर (वय 40, सर्व रा. तुरमुरी) अशी त्यांची नावे आहेत. काकतीचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुलेमान तहसीलदार, उपनिरीक्षक अर्जुन हंचीनमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

शुक्रवारी 21 सप्टेंबर रोजी रात्री उचगाव क्रॉसजवळ नितीन खांडेकर या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी सोमवारी पाच जणांना अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.