|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : शरद पवार

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : शरद पवार 

ऑनलाईन टीम / पुणे :

सातारा येथे झालेल्या सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये उदयनराजेंना संधी देऊ नये असे कोणीही म्हटलेले नाही. खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झालेली असून आगामी काळात पुन्हा एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. सातारा येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वच विधानसभेचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्याठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने दोन वेगवेगळय़ा बैठका झालेल्या आहेत. विधानसभा बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघाप्रमाणे चर्चा करण्यात आली. तर दुसऱया बैठकीमध्ये ज्यांना लोकसभा लढवायची आहे. त्यांच्यासमवेत चर्चा करण्यात आलेली आहे. या एकुणच बैठकीमध्ये कुठेही उदयनराजेंना विरोध असल्याचे समोर आले नाही. खेळीमेळीच्या वातावरणातच ही बैठक संपन्न झाली असल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकच्या संदर्भात विधानसभेचे सर्व सदस्य, लोकसभेचे सदस्य, पक्षाचे जिह्याध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष यांची एक संयुक्त बैठक माझ्या सोईनुसार आयोजित करण्यात येणार आहे. त्याची कल्पना उदयनराजे यांनाही देण्यात आली आहे. लवकरच ही बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Related posts: