|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » किल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता

किल्ले सिंधुदुर्गवर श्रमदानातून स्वच्छता 

प्रतिनिधी / मालवण:

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जि. प. सिंधुदुर्ग, पं. स. मालवण, ग्रा. पं. वायरी भुतनाथ, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांसह भंडारी ज्युनियर कॉलेजचे 80 विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी दिलिप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  हरेश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) कमलाकर रणदिवे, जिल्हा पर्यटन अधिकारी दीपक माने, तहसिलदार सुनील घारे, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, पं. स. सदस्य मधुरा चोपडेकर, वायरी भुतनाथ सरपंच घनश्याम ढोके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत म्हणाल्या, जिल्हय़ाला स्वच्छतेची परंपरा आहे. जिल्हय़ातील जनता ही स्वच्छता प्रिय असल्याने जिल्हय़ाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे स्वच्छतेमुळे खोवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले की, स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू आहे. या अभियान कालावधीत श्रमदान करण्याचे आवाहन केंद्र शासन व राज्य शासन यांच्यावतीने करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज श्रमदानातून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन आले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) कमलाकर रणदिवे यांनी केले, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी मानले.