|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन

कुडाळला उद्यापासून रानफुले छायाचित्र प्रदर्शन 

प्रतिनिधी / कुडाळ:

जागतिक वृक्षदिन आणि हरित ग्राहक दिनानिमित्त रंगकर्मी वामन पंडित यांचे अकरावे रानफुले छायाचित्र प्रदर्शन आणि पर्यावरण अभिवाचन असा कार्यक्रम गुरुवारी 27 व शुक्रवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8.30 या वेळेत येथील बाबा वर्दम रंगमंच (कुडाळ हायस्कूल) येथे आयोजित करण्यात आला आहे.

कुडाळ हायस्कूल (कुडाळ) आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक कमलाकर अणावकर व वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे उपस्थित राहणार आहेत. डॉ. गावडे व श्री. पंडित यांच्या ‘100 वर्षायू फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. जिल्हय़ातील रानफुलांच्या माहितीसह 350 रानफुलांची मांडणी या प्रदर्शनात करण्यात येणार आहे.

Related posts: