|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू 

प्रतिनिधी / कणकवली:

एमबुक्टो संलग्न बुक्टू प्राध्यापक संघटनेच्या आदेशानुसार जिल्हय़ातील प्राध्यापक आपल्या विविध मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सहभागी झाले. आंदोलनात सहभागी झालेल्या काही प्राध्यापकांनी मंगळवारी कुडाळातील संत राऊळ महाराज महाविद्यालासमोर एकत्र येत सरकारविरोधात घोषणा दिल्या.

प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, प्राध्यापकांचा थकित पगार द्यावा, सातव्या वेतन आयोग लागू करावा, नवीन पेन्शन योजना दूर करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानीत प्राध्यापकांना समान काम समान वेतन धोरणानुसार पूर्ण पगार मिळावा आदी अकरा मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

निदर्शने, धरणे, सामूहिक रजा आदी आंदोलने करुनही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हे राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन मंगळवारपासून छेडण्यात आले आहे. मंगळवारी बुक्टू युनियनचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. डॉ. शंकर वेल्हाळ, प्रा. विनोदसिंह पाटील व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अनंत लोखंडे यांनी जिल्हय़ातील महाविद्यालयांना भेटी देत आंदोलनात सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन केले. तसेच आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

Related posts: