|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » आवारे, सावंत, शॉ यांची पुरस्कारासाठी निवड

आवारे, सावंत, शॉ यांची पुरस्कारासाठी निवड 

वृत्तसंस्था / मुंबई

मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे 2018 साठी सर्वोत्तम क्रीडापटूंची एसजेएएम पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीतील सुवर्णपदक मल्ल राहुल आवारेची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला नेमबाज तेजस्विनी सावंत आणि हिना सिद्धू तसेच क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांचीही निवड करण्यात आली आहे. स्टार स्पोर्टस् वाहिनीतर्फे हा पुरस्कार वितरण समारंभ पुरस्कृत करण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेने 57 किलो फ्रिस्टाईल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. महिला नेमबाज तेजस्विनी सावंत आणि हिना सिद्धू यांची 2018 सालातील सर्वोत्तम महिला क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवोदित क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याची सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि कबड्डीपटू ऋशांक देवडिगा याचीही निवड केली आहे. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचा आजीवन पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ ऑक्टोबर महिन्यात आयोजित केला आहे.