|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘अजिंक्यतारा’ किफायतशीर दरासाठी कटिबध्द

‘अजिंक्यतारा’ किफायतशीर दरासाठी कटिबध्द 

अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द

प्रतिनिधी/ सातारा

शेंद्रे येथील उजाड माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी सभासद आणि शेतकऱयांच्या साथीने सहकाराचे नंदनवन फुलवले. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या या रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला असून या वटवृक्षामुळे अवघ्या सातारा तालुक्यातील शेतकरी खऱया अर्थाने आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाला आहे. शेतकऱयांनी पिकवलेल्या ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. नेहमीप्रमाणे यंदाही गाळपास येणाऱया ऊसाला अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. 

   दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्यामुळे साखर उद्योगाला उभारी मिळाली आहे. शेतकऱयांना एफ. आर. पी. चे पेमेंट वेळेत होण्याकरिता देशाच्या साखर उद्योगाला चालना मिळावी व साखर उद्योग बळकट करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी सतत पुढाकार घेऊन पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याचे यश म्हणजेच केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीसंदर्भात घेतलेला निर्णय होय, असेही आमदार शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले. 

  अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 35 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सौ. व श्री. शंकर शेडगे (अंगापूर तर्फ तारगाव), सौ. व श्री. रामचंद्र शेडगे (भरतगाव), सौ. व श्री. परशुराम भोसले (तासगांव), सौ. व श्री. गणपत सावंत (चिंचणी), सौ. व श्री. रामचंद्र साळुंखे, (भैरवगड), सौ. व श्री. उत्तम पवार (मांडवे), सौ. व श्री. आनंदराव घोरपडे, (खोजेवाडी) यांच्या हस्ते आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अणि चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मोठय़ा उत्साहात संपन्न झाला.

            यावेळी बोलतना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, शुभमुहूर्तावर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ झाला असून 1 ऑक्टोबर 2018 पासून
प्रत्यक्ष गाळपास सुरूवात होत आहे. या गळीत हंगामासाठी 8,974.75 हेक्टर्स क्षेत्राची नोंद झाली असून ही उपलब्धता विचारात घेता 7.00 लक्ष मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यक्षेत्रामध्ये जादा ऊस असल्यामुळे सर्वच ऊसाचे गाळप करणे कारखान्यासमोर फार मोठे आव्हान आहे. असे असले तरी सर्वच ऊसाचे यशस्वीपणे गाळप करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कारखान्याने ठरविले आहे. त्यासाठी आवश्यक तेवढी ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज केली आहे. केंद्र सरकारने साखर विक्रीचा दर प्रति क्विंटल रू. 2900/- केला  असल्याने मागील सन 2017-18 च्या गाळप हंगामाची एफ.आर.पी. पूर्ण करण्यास मदत झाली. शासनाने या हंगामापासून साखरेचे दर प्रति क्विंटल रू.2900/- वरून रू.3400/- करावा. जेणेकरून ऊस पुरवठादारांना एफ.आर.पी. प्रमाणे पेमेंट करणे सुलभ होईल. तसेच केंद्र सरकारने नुकतेच इथेनॉलचे प्रोत्साहनात्मक धोरण जाहीर केले असून यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. 

  सद्यस्थितीमध्ये केंद्र सरकारने इथेनॉलच्या किंमतीमध्ये 10.25 टक्के वाढ केली असल्यामुळे आपल्या अजिंक्यतारा कारखान्याने या हंगामात 30 लक्ष लिटर्स इथेनॉल निर्मिती करण्याचे ठरविले असून त्यासाठी आणखी 10 लक्ष लिटर्स क्षमतेचा स्टिल टँक उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. साखर उद्योगाचा विचार करता सद्यस्थितीमध्ये अनेक सहकारी साखर कारखाने अडचणीत आलेले असून आपला कारखाना मात्र सभासद व कर्मचाऱयांच्या सहकार्याने अडचणींवर मात करून प्रगतीपथावर आहे. कारखान्याच्या माध्यमातून सभासद व कर्मचाऱयांची आर्थिक सुबत्ता कायम ठेवण्यासाठी संचालक मंडळ सदैव कटिबध्द असून संस्थेप्रती सर्वांनी अभिमान ठेवावयास पाहिजे. संस्था टिकली तरच आपले अस्तित्व कायम राहील. सभासद व कर्मचारी यांच्या ताकतीवरच भविष्यामध्येही हा कारखाना सर्वतोपरी अजिंक्यच राहील.

  मागील सन 2017-18 च्या गाळप हंगामात शासन निर्धारीत एफ.आर.पी. दराप्रमाणे सर्व ऊसाचे पेमेंट केले असून शेतकऱयांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी ऊसाला उच्चतम दर दिला पाहिजे हे स्व.भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी संचालक मडळ सदैव कटिबध्द आहे. सन 2018-19 च्या गळीत हंगामात नोंद केलेला सर्वच्या सर्व ऊस आपल्याच कारखान्याला गाळपासाठी पुरवावा व गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यास सभासद, बिगर सभासद यांनी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी केले. 

  कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सुत्रसंचालन केले. ज्येष्ठ संचालक लालासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास शेडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कारखान्याचे सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती वनिता गोरे, सदस्य प्रतिक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, शिक्षण अर्थ समितीचे माजी सभापती सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, दादा शेळके, तात्यासाहेब वाघमळे, सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, सदस्या छाया कुंभार, बेबी जाधव, कांचन काळंगे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गणपतराव शिंदे, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. सुर्यकांत धनावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष धनंजय शेडगे, सातारा जिल्हा बँक संचालिका कांचन साळुंखे, माजी संचालक आण्णाबापू सावंत, अजिंक्यतारा सूत गिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, उपाध्यक्ष हणमंत देवरे, माजी अध्यक्ष पंडीतराव सावंत, माजी उपाध्यक्ष गणपतराव मोहिते, सदस्य सतीश टिळेकर, मजूर फेडरेशन माजी अध्यक्ष श्रीमंत झांजुर्णे, दादा पाटील-आनेवाडी, अजिंक्यतारा फळे, फुले संचालक मनोहर साळुंखे, पद्मसिंह फडतरे, दत्तानाना उतेकर, विलासराव घोरपडे, युनियन अध्यक्ष धनवे, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाचे सचिव सयाजी कदम, तसेच अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ऊस-उत्पादक-शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखाना अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते……