|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उत्पादन वाढविण्यासाठी पारंपरिक शेती पद्धत बदलावी

उत्पादन वाढविण्यासाठी पारंपरिक शेती पद्धत बदलावी 

बेळगाव / प्रतिनिधी

चांगल्या कारणासाठी बदल आवश्यक असून कृषी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पारंपरिक शेती पद्धतीत बदल करावा आणि कृषी उत्पादन वाढवावे. तांत्रिक बाबींचा वापर करून उत्पादनासह आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शनपर विचार जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी मांडले.

जि. पं. सभागृहात मंगळवारी ‘सर्वांगीण कृषी पद्धत’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन करून बोलताना अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी आज कृषी पद्धतीत आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे सांगितले. लोकसंख्येनुसार धान्याची मागणी वाढली आहे. यासाठी कृषी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. पारंपरिक शेती पद्धत बदलून जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर आणि आवश्यक तांत्रिक बाबींचा वापर करून पुन्हा हरितक्रांती घडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी सर्वांगीण कृषी पद्धत या विषयावर मार्गदर्शन केले. सौरऊर्जेचा वापर करून आणि रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर करून शेतकऱयांनी कृषी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. नरेगाअंतर्गत शेतकरी बांधवांना शक्मय ती मदत देण्यात येत आहे. कृषी खात्याच्यावतीने विविध योजनांद्वारे साहाय्य करण्यात येत आहे. जिल्हय़ातील शेतकऱयांमध्ये आत्मस्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांगीण कृषी पद्धतीचा वापर करणे गरजेचे बनले आहे. यासाठी जिल्हय़ातील शेतकरी बांधवांनी या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी शेतकऱयांसाठी असणाऱया विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अधिकारीवर्गाने काम करावे. योजनांची माहिती सर्वांना मिळावी, यादृष्टीने कृषी खात्यासह फलोत्पादन, वन आणि पशु संगोपन खात्याच्या अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली. व्यासपीठावर कृषी, वन आणि फलोत्पादन खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.   

 

Related posts: