|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन

ओव्हरब्रिजसाठी 20 नोव्हेंबरची डेडलाईन 

प्रतिनिधी / बेळगाव

खानापुर रोड येथील ओव्हरब्रिजचे काम धिम्या गतीने सुरू आहे.काम पुर्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने याची दखल घेवून खासदारांनी रेल्वे व महापालिकेच्या sअधिकाऱयांची मंगळवारी दुपारी तातडीने बैठक घेतली. ओव्हरब्रिज वाहतूकीकरिता खुले करण्यासाठी दि. 20 नाव्हेबरपर्यतची डेडलाईन दिली आहे.

 रेल्वे प्रशासनाला दिलेल्या डेडलाईनपुर्वी काम पुर्ण करणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. खानापूर रोड येथील ब्रिटीशकालीन ओव्हरब्रिजच्याठिकाणी नविन ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात येत आहे. मात्र काम पुर्ण करण्याची मुदत संपु÷ात आली आहे.तरीदेखील काम धिम्या गतीने सुरू आहे.  काम पुर्ण करण्यास आणखीन तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. याबाबतचे वृत्त तरूण भारतने प्रसिध्द केले. या वृत्ताची दखल घेवून खासदार सुरेश अंगडी यांनी महापालिका आयुक्त शशीधर कुरेरे आणि रेल्वे खात्याचे अभियंत्याची तातडीची बैठक काडा कार्यालयात आयोजित केली. यावेळी कामाचा आढावा घेण्यात आला असता पुलाचे गर्डर उपलब्ध झाले असून पावसामुळे ठेवण्यास अडथळा निर्माण झाला होता. यामुळे काम करण्याचे रखडले असल्याचे सांगण्यात आले. पण गर्डर ठेवण्यासाठी पेन दाखल झाल्या असल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी दिली. दि. 1 नोव्हेबरपर्यत काम पुर्ण करून ओव्हरब्रिज वाहतूकीकरिता खुला करण्याची सुचना  खासदारांनी केली. पण इतक्या कमी वेळेत काम पुर्ण होणे अशक्मय असल्याचे रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी सागितले. तसेच दि. 20 नोव्हेबर पर्यत काम पुर्ण करण्यात येईल असे सागितले. यामुळे दि. 20 नोव्हेबर पुर्वी  ओव्हरब्रिजचे काम पुर्ण करण्यासाठी डेडलाईन रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांना खासदार अंगडी यांनी दिली. त्याचप्रमाणे तिसरे रेल्वे गेटचे काम दि.15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सुचना केली.

बैठकीला महापालिका आयुक्त शशीधर कुरेर,  रेल्वे खात्याचे मुख्य अभियंते , कार्यकारी के.आर.शेट्टी, सहाय्यक अभियंते श्रीनिवास आदीसह अधिकारी उपस्थित होते.