|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » नाटय़ परिषद पुणे शाखेसाठी तीन पॅनेल रिंगणात

नाटय़ परिषद पुणे शाखेसाठी तीन पॅनेल रिंगणात 

पुणे / प्रतिनिधी :

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. यंदाची निवडणूक तीन पॅनेलमध्ये रंगणार आहे. नाटय़ परिषद, पुणे शाखेच्या विद्यामान कार्यकारिणीतील उपाध्यक्ष आणि नाटय़ संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार, अविनाश देशमुख आणि सदस्य विजय वांकर हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्मयता आहे. शाखा अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह डॉ. सतीश देसाई आणि प्रदीपकुमार कांबळे हे माजी अध्यक्ष अशी तीन स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आजमितीला 45 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.

नाटय़ परिषद, पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या 19 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे हे देशमुख यांच्या पॅनेलमध्ये आहेत. तर नाटय़ अभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि निकिता मोघे यांचा डॉ. सतीश देसाई यांच्या पॅनेलमध्ये समावेश आहे. प्रदीकुमार कांबळे यांनी आपल्या पॅनेलमध्ये नाटय़ व्यवस्थापकांना संधी दिली आहे. 

इच्छुक उमेदवारांना गुरुवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन शनिवारी (29 सप्टेंबर) निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथील नाटय़ परिषद कार्यालयामध्ये 7 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक मते संपादन करणाऱया 19 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरकर यांनी दिली. 

Related posts: