|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वे आता ‘नाणार’ पर्यंत

कोकण रेल्वे आता ‘नाणार’ पर्यंत 

रिफायनरी कंपनीचा रेल्वेला प्रस्ताव

व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची माहिती, अद्याप सर्वेक्षण नाही, प्रकल्पामुळे व्यवसाय वाढणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पापर्यत कोकण रेल्वे मार्ग जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रिफायनरी कंपनीचे तांत्रिक सल्लागार आपल्या संपर्कात असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल़ी या कामासाठी कोकण रेल्वे उत्सुक असून त्यामुळे कोकण रेल्वेला मोठा व्यवसायिक फायदा होईल, असे प्रतिपादन कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी केल़े

रत्नागिरी दौऱयावर असलेल्या गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी रत्नागिरीचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडये, मुख्य जनसंपर्क अधिकारी वर्मा आदी उपस्थित होत़े यावेळी गुप्ता म्हणाले नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार की नाही याबाबत आपण कोणतेही भाष्य करू शकत नाही. मात्र, त्या ठिकाणी रेल्वे जोडणीबाबतचा प्रस्ताव आला आहे. या मार्गाबाबत कोणतेही सर्वेक्षण सुरू झालेल नाही, तसेच चर्चेच्या टप्प्याच्या पुढे कामात प्रगतीही झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे कर्मचाऱयांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आपण रत्नागिरी दौऱयावर आलो आहोत़ कर्मचाऱयांनी पदोन्नती, भत्ते यासह अनेक अडचणी मांडल्या आहेत. कोकण रेल्वे कर्मचाऱयांना बोनस देण्याचा निर्णय अधिकृत संघटनेशी चर्चा करून जाहीर करण्यात येईल़ मध्य रेल्वे प्रमाण्sा कामगारांना बोनस मिळावा, अशी मागणी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे, त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे गुप्ता यांनी सांगितले.

रेल्वे कारखान्याचे काम लवकरच

खेड तालुक्यातील लोटे येथे रेल्वेचे सुटे भाग बनवण्याच्या कारखान्याला 300 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत़ त्याच्या जागेचे काम सुरू आह़े प्रत्यक्ष कामाची सुरूवात लवकरच करण्यात येईल़ कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारसोबत संपर्क सुरू आह़े हे काम लवकरच मार्गी लागेल़ रोरो सेवेपेक्षा मालवाहतुकीतून कोकण रेल्वेला चांगला फायदा मिळत आह़े यावर्षी कोकण रेल्वेला 126 कोटी रूपये नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

10 लाख गणेशभक्तांना सेवा

ते पुढे म्हणाले गणेशोत्सवात 8 ते 10 लाख प्रवाशांची वाहतूक कोकण रेल्वेने केली आह़े गतवर्षी 248 जादा गाडय़ा गणेशोत्सवात सोडण्यात आल्या होत्य़ा यावर्षी त्यांची संख्या 202 एवढी होत़ी गाडय़ा कमी झाल्या असल्या तरी गाडय़ांचे डबे वाढवण्यात आल्याने एकूण डब्यांची संख्या अधिक झाल़ी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी मडगावपर्यंत का नेण्यात येते, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले दादर-रत्नागिरी गाडी रत्नागिरी पर्यंतच धावत़े रेक मात्र मंगलोरला देखभाल दुरूस्तीसाठी पाठवला जात़ो ज्या स्थानकाच्या प्रवाशांसाठी जे डबे राखीव आहेत ते डबे स्थानकापूर्वी उघडले जाणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेत आहोत़ त्यामुळे प्रवाशांकडून तक्रारी येणार नाहीत़

मांडवी, कोकणकन्याचे डबे बदलणार

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया महत्वाच्या गाडय़ांच्या डब्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मांडवी व कोकणकन्या या गाडय़ांचे डबे जुने झाले असून लवकरच बदलण्यात येणार आहेत. अन्य गाडय़ांनाही नव डबे बसवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळुणात रेल्वे दुपदरीकरणाचे काम रोखणार!

पँइंटर आवश्यकच

कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचा इशारा

चिपळूण-कराड मार्गाचे काम सुरू न केल्यास विरोध

‘एमडी’नी प्रवाशांच्याही व्यथा जाणून घ्याव्यात

प्रतिनिधी /चिपळूण

अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झालेल्या चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे काम सुरू केल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरणाचे काम होऊन देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी कर्मचाऱयांच्या समस्या जाणून घेतानाच कधी तरी या मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांच्याही समस्या जाणून घ्याव्यात, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना चिपळूण-कराड रेल्वेमार्ग हा सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असल्याचे सांगितले. यावर बोलताना मुकादम यांनी सांगितले की, व्यवस्थापकीय संचालक कोकणच्या दौऱयात रेल्वे कर्मचाऱयांच्या समस्या जाणून घेतात, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांसाठी त्यांनी वेळ द्यावा.

कोकण रेल्वेने 210 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेस तब्बल 56 हजार बेरोजगारांनी अर्ज केले होते. प्रत्येक उमेदवाराकडून परीक्षा शुल्क म्हणून 500 रूपये घेतले गेले. यातून कोटय़वधी रूपये जमा झाले. वर्षभरात वेगवेगळय़ा पदांसाठी चार परीक्षा झाल्या. मात्र या परीक्षांचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. त्यामुळे ही बेरोजगारांची फसवणूक नाही का? शिवाय ज्या राज्याची मातृभाषा आहे त्याच भाषेत परीक्षा घेणे गरजेचे असताना महाराष्ट्रात मराठीतून परीक्षा का घेतली नाही, असा सवालही त्यांनी पेला.