|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शेअर बाजारात 218 अंकाची घसरण

शेअर बाजारात 218 अंकाची घसरण 

सेन्सेक्स मध्येही घसरण, निफ्टी 10,975 पातळीवर पोहचला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या देशातील वित्तीय क्षेत्रामध्ये अनेक घडामोडी होत आहे. देशातील सर्वात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्शियल आणि कन्स्ट्रक्शन कंपनी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्शियल लीजिंग सर्व्हिसेज लिमिटेडने संपूर्ण बिगरबँकिंग वित्त क्षेत्रात भूकंप केला आहे. 1,500 लहान असणाऱया बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचे परवाने नियामकाकडून रद्द करण्यात शक्यता आहे, ज्यांच्याकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही असे या क्षेत्रातील अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

आता बिगर बँकिंग वित्त कंपन्यांच्या नवीन अर्जांना मंजुरी देणे टाळण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बिगर बँकिंग वित्त कंपन्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. मागील शुक्रवारी एका निधी व्यवस्थापकाकडून दिवान हाऊसिंग फायनान्सचे अल्पकालीन रोखे मोठय़ा सवलतीवर विक्री करण्यात आले. यामुळे रोख रकमेच्या संकटाची समस्या वाढण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बाबी समोर येत आहे, यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांची संख्या घटण्याची चिन्हे दिसत आहेत. कंपन्यांना आता संपत्ती आणि कर्जातील अंतराकडे लक्ष द्यावा लागणार आहे. काही कंपन्यांनी अल्प कालावधीसाठी कर्ज दिले होते, त्यांना आता अधिक निधीची दीर्घकाळासाठी गरज पडणार आहे, असे आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर आणि बंधन बँकेचे अव्यवस्थापकीय संचालक हारुन रशिद खान यांनी सांगितले.

अशावेळी गाव आणि लहान वाडय़ांमध्ये कर्ज देणाऱया हजारो लहान-लहान कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. आता 11,400 बिगर बँकिंग वित्त कंपन्या संशयाच्या फेऱयात अडकल्या असून त्यांचा एकूण ताळेबंद 22.1 लाख कोटी रुपये आहे. या बँकांवर कमी प्रमाणात कायद्याचे नियंत्रण आहे. 

Related posts: