|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहतूक संघटनेच्या संपर्क प्रमुखपदी संजय देशमुखांची निवड

वाहतूक संघटनेच्या संपर्क प्रमुखपदी संजय देशमुखांची निवड 

प्रतिनिधी/ वडूज

 खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील सुपुत्र व ट्रान्सपोर्ट उद्योजक संजय सुभाष देशमुख यांची राजे प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याचे पत्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 संजय देशमुख यांच्या कार्याची, व्यवसायाची दखल घेऊन त्यांची संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी संजय देशमुख यांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट ट्रान्सपोर्ट बिझनेस पार्टनर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 संजय देशमुख म्हणाले, राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे, ध्येय, धोरणे तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी सुनील काटकर, कायदेशीर सल्लागार अनुप गाडे, प्रशांत जाधव, बाळासाहेब भोसले, गुलाब जाधव यांची उपस्थिती होती.