|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » इंधन दरवाढ थांबता थांबेना ; मुंबईत पेट्रोल 90.75 रूपये

इंधन दरवाढ थांबता थांबेना ; मुंबईत पेट्रोल 90.75 रूपये 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गेल्या काही दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दराचा भडका सुरूच आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोल प्रतिलिटर 90.75 रुपयांवर गेलं आहे. तर डिझेलच्या दरातही 22 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रतिलिटर डिझेलसाठी आता 79.23 रुपये मोजावे लागणार आहेत. इंधनाच्या दरात होत असलेल्या वाढीनं जनता अक्षरशः त्रासली आहे. अद्यापही या दरवाढीतून मोदी सरकारनं सामान्यांना दिलासा दिलेला नाही.

मुंबईबरोबरच राजधनी दिल्लीतही इंधनाचे दर भडकले आहेत. राजधनीतही पेट्रोलचा दर 22 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 83.40 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात 21 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिलिटर डिझेलसाठी दिल्लीकरांना 74.63 रुपये मोजावे लागणार आहेत.