|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘स्वाईन फ्लू’ने दोन महिलांचा मृत्यू

‘स्वाईन फ्लू’ने दोन महिलांचा मृत्यू 

प्रतिनिधी / कोल्हापूर

स्वाईन फ्लूने शहरातील दोन महिलांचा मृत्यू झाला. विजयमाला कुमार विधाते (वय 50, रा.शुक्रवार पेठ, जि.कोल्हापूर) व नंदा देवकर (वय 50, रा. राजारामपुरी, जि.कोल्हापूर) अशी  स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. यामुळे जिल्हयातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या 21 वर पोहचली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती अशी, शुक्रवार पेठेतील विजयमाला विधाते व राजारामपुरीतील नंदा देवकर या दोन्हीही महिलांना दि.22 सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. अवघ्या सहा दिवसांत त्यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.28) स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, शहरासह जिल्हयाला स्वाईन फ्लूचा विळखा पडला असून बळींची संख्या 21 वर पोहचली आहे. तसेच सीपीआरसह शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये 50 स्वाईन फ्लूचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये संशयित 15 तर पॉझिटिव्ह 35 रुग्णांचा समावेश आहे. संशयित पेक्षा पॉ†िझटिव्हची रुग्ण संख्या अधिक आहे. सीपीआरमध्ये सध्या 4 संशयित तर 2 पॉझिटिव्ह स्वाईन फ्लूचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. संशयित रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तर पॉ†िझटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अशी मा†िहती जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये सुमारे 14 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असल्यामुळे जिल्हयासह शहरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.