|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खाणग्रस्तांना काँग्रेस सेवा दलाचा पाठींबा

खाणग्रस्तांना काँग्रेस सेवा दलाचा पाठींबा 

प्रतिनिधी/ पणजी

 गेले अठरा महिने खाण बंदीमुळे पिडीत असलेल्या खाण अवलंबियतांना काल कॉगेसच्या सेवा दलाने आझाद मैदानावर बसलेल्या या कर्मचाऱयांना आपला पाठींबा दर्शविला तसेच त्यांना पूर्ण भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी केले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली निवडणूक काळात देशात करोडो युवकांना रोजगार देणार असे आश्वासन दिले होते पण तसे काहीच झाले नसून लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे. नोकरीवर होते त्यांचे काम बंद पडल्याने त्यांना घरी बसावे लागले गोव्यात खाणी बंद होऊन आता अनेक वर्षे झाली तरी अजून सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. गेले अठरा महिने हे लोक वेगवेगेळय़ा ठिकाणी आंदोलनात बसले आहे. याचे सरकारला काहीच पडले नाही. गोव्यात सरकारचे अस्थित्वत नाही, असा आरोपही यावेळी राकेश शेट्टी यांनी केला.

 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने गोव्यात अनेक समस्या पडून आहे. त्यामुळे खाण ग्रस्तांच्या समस्या अजून पडून आहे. आम्ही कॉंग्रस पक्ष त्यांच्या सोबत असून त्यांना त्यांचे नुकसान भरावी मिळावी तसेच त्यांना काम मिळावे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार आहे. सरकारला नोकऱया देता येत नसेल तर नोकरीवर असलेल्यांना घरी बसवू नये. आज अनेक खाण कुटुंबे रस्त्यवर आली आहे. त्यांचा  उदरनिर्वाह बंद झाला आहे. यावर सरकारने तोडगा काढणे आवश्यक आहे.

 सरकारने कॅसिनो सारख्या दलालांना मदत करते पण स्थानिक गरिब लोकांना सरकाची मदत मिळत नाही. आता आम्ही कॉंगेसतर्फे मांडवी बचाव आंदोलन सुरु करणार आहे. असेही यावेळी राकेश शेट्टी यांनी सांगितले. यावेळी काँगेसचे अनेक कार्यकर्ते खाण अवलंबियतांना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते.

Related posts: