|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

पितरांचे स्मरण पूजन सर्वपित्री अमावास्या

बुध. दि. 3 ते 9 ऑक्टोबर 2018

महालय पितृपंधरवडय़ाविषयी प्रचंड माहिती वॉटसऍपद्वारे उपलब्ध झालेली आहे.  पण जागेची व वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्याचा सारांश दिलेला आहे. प्रेतशाप, पितृशाप, मातृशाप, भातृशाप, पत्नीशाप, बळी दिल्याने मुक्मया प्राण्यांचा तळतळाट, सावकारी, बळजबरी, छळणूक, एखाद्याची अन्नान्नदशा करणे काही  तरी खोटेनाटे सांगून नोकरीवरून काढणे, पोटावर पाय आणणे, जागा व मालमत्ता बळकावणे, व्याज बटय़ाचा व्यवसाय, अपघाती मृत्यू, बदनामी, एखाद्याचा निष्कारण दुश्वास करणे, गळफास, विषप्रयोग, दरोडे, अग्निप्रलय, जलप्रलय, बॉम्बस्फोट, विषारी वायूने मृत्यू यासह अनेक घटनांतून हजारो शाप निर्माण होतात. माणूस म्हटला की हे सारे प्रकार आलेच. ज्यांनी हे केले त्यांची पुण्याई शिल्लक असेपर्यंत सर्व काही नीट चालते पण वेळ फिरल्यावर पुढील पिढीस ते भोगावे लागते. अतृप्त आत्मे पिशाचरुपाने अंतराळात फिरत असतात. त्यामुळे सध्याच्या पिढीवर परिणाम होऊन त्यांची प्रगती होत  नाही. पूर्वजांच्या हातून काय अनिष्ट कृत्य घडले आहे हे कळणे कठीण असते. तृप्त अतृप्त सर्व आत्मे या काळात भूतलावर अदृश्य रुपाने अवतरतात. त्यांना शांत ठेवण्यासाठी या महिन्यात त्यांच्या नावाने श्राद्ध करावे. सर्वपित्री अमावास्या हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. आपल्या हातून कुणाचे कधीही कोणत्याही प्रकारे वाईट होणार नाही याची काळजी घ्या.

महालय श्राद्ध किती प्रकारात करता येईल? कारण अनेक श्रद्धावान अस्तिक असतात परंतु नोकरीमुळे किंवा धावपळीमुळे त्यांना काहीवेळा थोड कठीण होत त्यांच्याकरता.

  1. दोन किंवा पाच ब्राह्मण, किंवा चटावर दर्भबटू ब्राह्मण योजना करून श्राद्ध स्वयंपाक करून सपिंडक महालय.

2.आमान्न म्हणजे शिधा सामग्री योजना करून आमश्राद्ध

  1. दूध, केळे, अल्पोपहार यांची योजना करून हिरण्यश्राद्धा यात पिंडदान नसते.
  2. ब्रह्मार्पण, दोन, पाच ब्राह्मण व सवाष्ण कोणी गेली असेल तर सवाष्ण (सुवासिक) पूजन करून अन्नसंतर्पण यात पिंडदान नसते.
  3. एखाद्याची आर्थिक स्थिती नसेल किंवा मनुष्यबळ वयोमानानुसार कमी असेल तर ‘शमीपत्र’ एवढा पिंड दिलेलाही शास्त्रसंमत आहे. शमीपत्र हे भाताच्या शिताएवढेच असते.

यातील काहीच जमत नसल्यास घोर वनात जाऊन दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून आपल्या दोन्ही काखा वर करून माझी आर्थिक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राद्ध करू शकत नाही, या बद्दल क्षमायाचना करून पितरांचे स्मरण केले तरी श्राद्ध होते.

अग्निदाह झालेले किंवा अग्निदग्ध न झालेले गर्भस्त्रावात मृत झालेले ज्यांना रुपहि प्राप्त न झालेले या सर्वांनाही एक भाग श्राद्धात महालयात दिला जातो.

मेष

या आठवडय़ात आरोग्याची विशेष  काळजी  घ्यावी लागणार आहे. या सप्ताहात दूरचे प्रवास शक्मयतो टाळा. आर्थिक दृष्टय़ा परिस्थिती उत्तम राहील. अडलेली रक्कम असल्यास प्रयत्न केल्यास मिळू शकेल. जागा अथवा घर खरेदी करणार असाल तर कागदपत्रे नीट पडताळून पहा. मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या. नोकरी अथवा व्यवसायात उधार उसनवार करू नका. पोटाच्या विकाराची काळजी घ्या.


वृषभ

स्वत:च्या आत्मविश्वासानेच जीवनाची प्रगती साधाल. कामाचा ताणतणाव अधिक वाढेल. व्यवसायात मनासारखी प्रगती होईल. कुटुंबामध्ये ताणतणाव, भांडण, तंटे, वाढू देऊ नका. प्रेमप्रकरणापासून शक्मयतो दूर रहा. काही उच्चअधिकाऱयांची भेट होऊन महत्त्वाची कामे होऊ लागतील. घरातील या पक्ष पंधरवडय़ात  पूर्वजांचे श्राद्ध करा व आशीर्वाद घ्या. घाई गडबडीत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.


मिथुन

प्रवास करताना शक्मयतो काळजी घ्या. शेजारी पाजारी व नातेवाईक यांचा नाहक त्रास जाणवेल. मित्र मैत्रिणींचे सहकार्य उत्तम मिळेल. पण त्यांच्यावर अतिविश्वास ठेवू नका. मनातील काही गुप्त गोष्टींचा उलगडा करू नका. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर पूर्ण तयारी करावी लागणार आहे. खाण्यापिण्यावर विशेष ध्यान द्या. गॅस, पित्त, पोटदुखीचा त्रास सुरू होईल.


कर्क

कोणतेही महत्त्वाचे काम तुम्ही स्वत:च करा. सफलता मिळेल. धार्मिक कार्याकडे कल वाढेल. वाहन चालविताना काळजी घ्या. देण्या-घेण्याचा कोणताही व्यवहार असेल तर या सप्ताहात पूर्ण करा. स्वत:च्या आळशीपणामुळे काही महत्त्वाची कामे अडली जातील. कोर्ट कचेऱयांच्या कामामध्ये सावधानता बाळगा. या आठवडय़ात बाहेरचे खाणे शक्मयतो टाळा. नको त्या व्यक्तींचा तळतळाट अंगलट येणार नाही याची काळजी घ्या.


सिंह

महत्त्वाची अडलेली कामे हळूहळू होऊ लागतील. नवीन व महत्त्वाचे काम सुरू करताना थोरामोठय़ांचा व जाणकारांचा सल्ला घ्या. या आठवडय़ात शारीरिक अस्वस्थता जाणवेल. नोकरीत बदली व बढतीचा योग येईल. काही कारणास्तव अचानक आर्थिक खर्च वाढेल. मित्र मैत्रिणींच्याबरोबर अचानक वादविवाद, संघर्ष निर्माण होईल. कोणतेही वाहन चालविताना गाडी निट तपासून गाडी चालवा. कोर्ट कचेऱयापासून या सप्ताहात दूर रहा.


कन्या

खर्चात अचानक वाढ होईल. जमीन अथवा वाहन घेण्याचे विचार मनात येतील. शारीरिक ताण तणाव वाढेल. नवीन व्यक्तिंची ओळख होऊन काही मनोरथ पूर्ण होईल. कोणाच्या सांगण्यावरून चुकीचे काम करू नका. व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपल्या सहकार्यामुळे इतरांची अडलेली कामे होत जातील. या आठवडय़ात कोणाकडूनही करू नका. अन्यथा पुढे अडचणी निर्माण होतील.


तूळ

व्यापारी उद्योग व्यवसायात आर्थिक आवक मनासारखी होईल. स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. जुनी येणी वसूल होतील. महत्त्वाच्या कार्यसिद्धीसाठी धावपळ करावी लागेल. मोठय़ा अधिकाऱयांशी या सप्ताहात जपून वागावे लागेल. घाईगडबडीने प्रवास करू नका. शत्रूपक्षाचा त्रास हळूहळू कमी होऊ लागेल. डोकेदुखी व डोळय़ांची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तु खरेदी करताना काळजी घ्या.


वृश्चिक

पूर्वीपेक्षाही आता आपली आर्थिक परिस्थिती हळुहळू सुधारू लागेल. संततीच्या बाबतीतील समस्या हळूहळू सुटू लागतील. कोर्ट कचेऱयांची कामे होऊ लागतील. नोकरीत ताणतणाव  सुरू होईल. नको असलेल्या वस्तुंची निष्कारण खरेदी करू नका. आळसपणा सोडून महत्त्वाच्या कामाला लागा. जीवनसुखी होईल. घरातील वडिलधाऱया माणसांच्या आरोग्याची काळजी घ्या.


धनु

काही महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतील. नोकरीत अचानक बदलीचे योग येतील. देवाण घेवाणाच्या व्यवहारातून वादविवाद, भांडणतंटे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. आई-वडिलांचा व थोरामोठय़ांच्या आशीर्वादाने जीवनात यश संपादन करू शकाल. दुसऱयाच्यावर विश्वास ठेवून महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवू नका, अन्यथा आर्थिक हानी होईल.


मकर

स्वत:च्या कुलदेवतेची आराधना वाढवा. व्यवसायात वाढ करताना बरीच धावपळ करावी लागणार आहे, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत असणाऱयांनी वरि÷ अधिकाऱयाबरोबर वादविवाद टाळावेत. आयुष्याच्या जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. जुनी येणी असतील तर त्यासाठी प्रयत्न करा. आपापसातील सहकार्य व विचारपूर्वक निर्णय यामुळे महत्त्वाची कामे हळूहळू होऊ लागतील.


कुंभ

ज्याच्यावर अतिविश्वास टाकाल, तिच क्यक्ती आपला विश्वासघात करणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तिमुळे चिंता निर्माण होईल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. विवाह कार्याचे योग येतील. शुभकार्याची सुरुवात करताना देवीची आराधना करूनच सुरुवात करा. काही वेळा कोठून  तरी अपमानास्पद वागणूक मिळेल. सावध रहा. घराची, शेतीवाडीची, जमीनजुमला यांची वाटणी करताना काळजी घ्या.


मीन

नोकरीत प्रमोशन व पगारवाढीचे योग येतील. कुटुंबात वादविवाद व खटके उडणार नाहीत याची काळजी घ्या. नऊ व दहा तारखेला वाहन चालविताना काळजी घ्या. कोर्टकचेरीत मनासारखे यश मिळणार नाही. मुलाबाळांच्यासाठी काही खर्च उद्भवेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर व मित्र-मैत्रिणींच्या बरोबर वादविवाद टाळा. काही व्यवसायाच्या निमित्ताने दूरचे प्रवास घडतील.