|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » आज पासून फैजपूरहून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्यास प्रारंभ

आज पासून फैजपूरहून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्यास प्रारंभ 

जळगाव / प्रतिनिधी :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आपल्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा जळगाव जिल्हयातील फैजपूर येथून उदया गुरूवारी 4 ऑक्टोबर पासून सुरू होत असून यात्रेचा समारोप 8 ऑक्टोबरला अहमदनगर येथे जाहीर सभेने करण्यात येणार आहे . या जनसंघर्ष यात्रेची पूर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी आज काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. . यावेळी फैजपूरची सर्व जबाबादरी सोपवलेले काँग्रेसचे माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे उपस्थित होते .

1936 मध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन फैजपूरला झाले होते ,याच जागेपासून या जनसंघर्ष यात्रेचा दुस-या टप्प्याचा शुभारंभ उदया 4 ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता होत आहे. . महाराष्ट्राचे प्रभारी मल्ल्कािर्जून खर्गे ,प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यासह काँग्रेसचे 50आमदार या यात्रेत यात्रेत सहभागी होत असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले .

फैजपूर येथे जनसंघर्ष यात्रेच्या शुभारंभास दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तर यात्रेच्या समवेत युवक काँग्रेसचे 200 कार्यकर्ते हे मोटार सायकलवर यात्रेच्या प्रारंभी जिल्हयात राहणार आहेत.या जनसंघर्ष यात्रे निमित्ताने फैजपूरला 1936 ला झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदया फजपूर बोदवड भुसावळ येथे जाहीर सभा घेउुन रात्री यात्रा मुक्कामास जळगावला येणार आहे .शुक्रवारी सकाळी शहरातील विचारवंतांसमवेत चर्चेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर ही जनसंघर्ष यात्रा एरंडोल ,पारोळा, अमळनेर मार्गे धुळे जिल्हयात शिंदखेडा येथे रात्री प्रवेश करेल. नंतर ,नंदुरबार नाशिक व नगर जिल्हयात जात असून समारोप 8 ऑक्टोबरला अहमदनगर येथे जाहीर सभेने होईल .फोटो कागदपत्र यांचे प्रदर्शन शुभारंभ स्थळी मांडण्यात आले असून या ऐतिहासिक अधिवेशनास पन्नास वर्ष पूर्ण झाल्या बदृल येथे प्रेरणा स्तंभ उभारण्यात आला आहे . या प्ररणा स्तंभास जनसंघर्ष यात्रेतील नेते आदरांजली अर्पण करून नंतर जाहीर सभेस संबोधन करतील व यात्रेस प्रारंभ करतील असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले .दरम्यान या परिसरात वातावरण निर्मितीसाठी रावेर यावल सावदा फैजपूर येथे रॅलींचे आयोजन करण्यात आले होते.

Related posts: