|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदींना जागतिक पुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदींना जागतिक पुरस्कार प्रदान 

पर्यावरण संरक्षणाचा सर्वोच्च पुरस्कार यंदा सहा जणांना 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चँपियन ऑफ द अर्थ’ हा पर्यावरण संरक्षणाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. येथे एका भव्य कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गटेसर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

जगाला आज पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने धाडसी निर्णय घेणारे नेते हवे आहेत. मोदी तसे नेते आहेत. त्यांनी जगासमोर या क्षेत्रात नवे उदाहरण घालून दिले आहे, अशी प्रशंसा गटरेस यांनी कार्यक्रमानंतर ट्विटरच्या माध्यमातून केली.

हा भारतीयांचा सन्मान

मला हा पुरस्कार मिळणे हा सर्व भारतीयांचा सन्मान आहे. पर्यावरणाचे संरक्षण केले नाही तर नैसर्गिक आपदांपासून सुटका होणे शक्य नाही. सबका साथ सबका विकास ही भारताची घोषणा आहे. सबका साथ मध्ये निसर्गाचाही समावेश आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.