|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » पुतिन भारतात,पाक दहशतवादाचा मुद्दा अजेंडय़ावर

पुतिन भारतात,पाक दहशतवादाचा मुद्दा अजेंडय़ावर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून दोन दिवसीय भारत दौऱयावर येत आहेत. एस-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी कराराच्या दृष्टीने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्वाचा आहे. आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार आहे. या खरेदी करारावर गुरुवारी पंतप्रधन मोदी आणि पुतिन स्वाक्षरी करतील.या कराराशिवाय मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये सुरक्षेच्या आघाडीवरील वेगवेगळी आव्हने, पाकिस्तानकडून असलेला दहशतवादाचा धोका या मुद्यावरही चर्चा होईल. भारत आणि रशियामध्ये अवकाश सहकार्य करारही होण्याची  शक्यता  आहे.

 

भारताने रशियाबरोबर एस-400 क्षेपणास्त्राचा खरेदी करार केला तर अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याचीही शक्मयता आहे. रशिया बरोबर शस्त्रास्त्र करार केला तर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱया देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. कारण चीनने रशियाकडून एसयू-35 फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-400 मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत इराण, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांवर निर्बंध घातले आहेत.