|Friday, July 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मुकेश अंबानी 11 व्यांदा सर्वाधिक धनाढय़ भारतीय

मुकेश अंबानी 11 व्यांदा सर्वाधिक धनाढय़ भारतीय 

मुंबई  / वृत्तसंस्था :

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत सलग 11 व्यांदा सर्वाधिक धनाढय़ भारतीय ठरले आहेत. रिलायन्स जिओ आणि ब्रॉडब्रँडच्या यशामुळे त्यांची मालमत्ता मालमत्ता 3.45 लाख कोटी 47.3 अब्ज डॉलर्स) रुपयांवर पोहोचली आहे. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी 1.53 लाख कोटी (21 अब्ज डॉलर्स) च्या मालमत्तेसह दुसऱया क्रमांकावर राहिले आहेत. टक्केवारीच्या आधारावर किरण मजूमदार शॉ यांच्या मालमत्तेत सर्वाधिक 66.7 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

फोर्ब्सच्या या यादीत 4 महिलांचा समावेश आहे. देशाच्या आघाडीच्या 100 श्रीमंतांपैकी 11 जणांच्या मालमत्तेत 1 अब्जाहून अधिकची भर पडली आहे. तर आघाडीच्या 100 श्रीमंतांची सामूहिक मालमत्ता या कालावधीत वाढून 492 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.