|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » सनादिया मुराद, मुकवेगे यांना शांततेचा नोबेल

सनादिया मुराद, मुकवेगे यांना शांततेचा नोबेल 

ऑनलाईन टीम / स्टॉकहोम :

युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात केलेल्या कामाबद्दल नादिया मुराद आणि कांगोचे डॉ. डेनिस मुकवेगे यांना 2018 सालचा मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. आतापर्यंत 98 जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात 104 लोकांचा आणि 27 संघटनांचा समावेश आहे. या 104 विजेत्यांमध्ये 16 स्त्रियांचा समावेश आहे.

2016 मध्ये निवड समितीकडे 376 लोकांची नावं आली होती. यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी 331 जणांची नावं आली होती. यामध्ये 216 लोकांची आणि 115 संघटनांची नावे होती. त्यातून नादिया मुराद आणि डेनिस मुकवेगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

डेनिस मुकवेगे हे मुळचे कांगोचे रहिवासी आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे. मुकवेगे हे स्त्रीरोग तज्ञ असून त्यांनी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे.

नादिया मुराद या इराकच्या असून त्या यजीदी या अल्पसंख्याक समाजातील आहेत. आयएस या दहशतवादी संघटनेने नादिया यांचं अपहरण केलं होतं. त्यांच्यावर आयएसच्या अतिरेक्मयांनी अनेकवार बलात्कार करून त्यांचं शोषण केलं होतं. त्यांना आयएसची सेक्स स्लेव्हही म्हटलं जातं. या अतिरेक्मयांच्या तावडीतून पळाल्यानंतर नादिया यांनी जगभरातील महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जनजागृती करण्याचं काम केलं.

दोघांच्या या सर्वोच्च कार्याची पोचपावती म्हणजे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.