|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मेंढपाळ लागले परतू… चार महिन्याने लोटले घराकडे

मेंढपाळ लागले परतू… चार महिन्याने लोटले घराकडे 

संतोष चव्हाण/ यड्राव

धनगर समाजाच्या पारंपारीक व्यवसाय म्हणजे मेंढपाळ होय. शेकडो, हजारो मेंढया घेवून ऊन, वारा, पाऊस न पाहता आपल्या संसारासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी हा व्यवसाय करत आहे. आजही आपल्या संसाराच्या साहित्य घेवून बीराड घोडयांच्या पाठीवर लादून, विशेषत: माहिलां डोक्यावर हारा (मोठी बुट्टी), कमरेवर लहान मुले घेवून शेकडो मैल पायापिट करत कमी पर्जन्याच्या ठिकाणी स्थलांतरीत होतात. विशेषत: मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आणि जून महिन्याच्या निम्यापर्यंत हे मेंढपाळ स्थलांतरीत होत असतात. पावसाळा संपायला लागला की परतू लागतात.

पावसाळ्यानंतरचे काही दिवस आणि हिवाळा ऋतूच्या सुरूवातीला मेंढपाळ हा आपल्या गावातच स्थानिक होतो. त्यानंतर हिवाळा ऋतू मध्यावर आला आणि उन्हाळ्याची चाहुल लागताच तेच डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून कोकणात निघून जातात. जून ते ऑक्टोबर अखेर या चार माहिन्यात मेंढपाळ सांगली जिल्हातील जत, कवठेमहंकाळ, तासगाव तसेच विजापूर, गदग, जमखंडी, शेवट आंध्रप्रदेशाच्या सीमाकाठापर्यंत बकरी घेवून जातात.

शिरोळ, हातकणंगले, कर्नाटक राज्यातील निपाणी, चिकोडी तालुक्यासह सिमाभागातील मेंढपाळ आपल्या मेढयासह आता परतू लागले आहेत.

– शेळ्या मेंढयाच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मेंढपाळ कमी पाऊस असलेल्या ठिकाणी दरवर्षी आमचं गाव सोडून कमी पावसाच्या ठिकाणी जात असतो. सद्या पावसाळा संपत आला आहे. त्यामुळे आता स्थलांतरीत झालेले सर्वजन गावाकडे निघालो आहे. दोन अडीच महिने गावाकडे राहून पुन्हा कोकणाकडे बकरींच्या चाऱयासाठी जावे लागते.