|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » भास्कर जाधवांसाठी तटकरेंची रायगडमधून माघार

भास्कर जाधवांसाठी तटकरेंची रायगडमधून माघार 

ऑनलाईन टीम / पुणे :

रायगडमधून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचं नाव निश्चित होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी माघार घेतल्याने, भास्कर जाधव यांनी बैठकीत रायगडमधून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

यासंदर्भात सुनील तटकरे यांनीही जाधव यांना ग्रीन सिग्नल दिल्याचा संकेत तटकरेंच्या प्रतिक्रियेतून मिळत आहेत. तटकरे म्हणाले की, तात्काळ मी निवडणूक लढवण्यास इच्छूक नाही. भास्कर जाधव यांची इच्छा असेल, तर त्यांना संधी द्यावी, आम्ही काम करू असं स्पष्ट केलं.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. या बैठकीत जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघातील जागांचा आढावा घेण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. राज्यातील 17 जिह्यांचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे समजते.

दरम्यान, मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची चर्चा करु नका असे आदेश शरद पवार यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.