|Friday, February 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » हिजडा शॉककथेला एक कोटीपेक्षा अधिक व्हय़ूज

हिजडा शॉककथेला एक कोटीपेक्षा अधिक व्हय़ूज 

व्हायरस मराठी या यू टय़ूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हिजडा’ या शॉककथेला एक कोटी व्हय़ूज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मराठीमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे.

  मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेनमध्ये भीक मागणारा हिजडा यांची ही गोष्ट आहे. अभिनेत्री छाया कदम हिने हिजडय़ाची भूमिका केली आहे. आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी हिजडा रंगवला होता. पण सतत वेगळय़ा भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱया छाया कदम यांनी हा हिजडा खूप छान उभा केला आहे. अक्षय शिंपी याने सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका केली आहे. या व्हिडीओची कथा मुकेश माचकर यांची आहे.  गाण्याचे व्हिडीओ पॉप्युलर होतात पण ही शॉककथा जगभर पहिली गेली हे या व्हिडिओला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंटस्वरून लक्षात येते. 48 हजार  लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.

Related posts: