|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » माणसातील मानसिक विकृती नष्ट होणे गरजेचे

माणसातील मानसिक विकृती नष्ट होणे गरजेचे 

म्हाडा अध्यक्ष, आमदार उदय सामंत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

 सध्या माणसातील मानसिक विकृती नष्ट करण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे संगोपन करताना मुलींबरोबर मुलांनाही कसे वागले पाहिजे, हे सांगणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले. येथील मराठा मैदानवर रत्नागिरी नगर परिषदच्या वतीने आयोजित कन्या – माता सुसंवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 यावेळी म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव आनंद सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, बांधकाम समिती सभापती रशिदा गोदड, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रद्धा हळदणकर, समाजकल्याण समिती सभापती वैभवी खेडेकर, नगरसेविका राजेश्वरी शेटय़े,  शिल्पा सुर्वे, उज्ज्वला शेटय़े,  दिशा साळवी, मिरा पिलणकर,  अस्मिता चवंडे,  फरहा पावसकर, कौशल्या शेटय़े, मुख्याधिकारी अरविंद माळी, डॉ.तोरल शिंदे, डॉ.निशिगंधा पोंक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मितल पावसकर यांनी केले. यावेळी त्यांनी पुढील टप्प्यात मुली- मुलगे व माता-पिता यांचा एकत्रित सुसंवाद मेळावाही आयोजित करण्यात येईल असे आवर्जून नमूद केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत कन्यांच्या हस्ते गुलाबपुष देऊन करण्यात आले.

            या कन्या – माता मेळाव्यात वयात येणाऱया मुलींच्या बदलणाऱया मानसिक भावविश्वासाचा उलगडा स्त्राrरोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी केला. तसेच डॉ.निशिगंधा पोंक्षे यांनीही मुलींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.

न्यायाधीश आनंद सामंत यांनी मुली व मातांनी वाईट प्रवृत्तींविरोधात आवाज उठविण्याची गरज प्रतिपादित केली. सध्या सक्षम पालकत्वात समाज आणि पालकांची जबाबदारी विशद करताना आईची असणारी विशेष जबाबदारी उपस्थितांसमोर प्राचार्य मंजिरी साळवी यांनी मांडली. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी वयात येणाऱया मुलींचा आहार व आरोग्य याबद्दल मातांना उद्बोधित केले. नगर पालिकेने राबविलेला या अभिनव उपक्रमाची सध्याच्या काळात नितांत गरज होती, असेही मार्गदर्शक यावेळी म्हणाले.

            नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी बदलत्या काळात कन्या – माता यांच्यातील सुसंवाद अत्यावश्यक असल्याची गरज नमूद करतानाच आधुनिक युगात मुलींनी अधिक कणखर बनण्याची गरज अधोरेखित केली.

            आमदार सामंत म्हणाले, रत्नागिरी नगर पालिकेने आयोजित केलेला हा कन्या व माता यांच्यातील सुसंवादासाठीचा आयोजित केलेला मेळावा रत्नागिरी जिह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम आहे. आता ज्याप्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेने मुलींबाबतच्या जाणीव जागृतीसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याप्रमाणेच मुलांनीही कसे वागले पाहिजे यासाठीही भविष्यात आयोजन करावे. पालकांनी सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या मुला-मुलींशी मैत्रीचे नाते जपणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांनी नगराध्यक्ष राहुल पंडित व मुख्याधिकारी  अरविंद माळी यांचे विशेष कौतुक केले. 

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंजिरी लिमये यांनी केले, तर आभार नगरसेविका सौ. श्रद्धा हळदणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीने विशेष परिश्रम घेतले.