|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उद्योजकांनी प्राप्तीकर भरण्याच्या कालावधीत वाढ

उद्योजकांनी प्राप्तीकर भरण्याच्या कालावधीत वाढ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उद्योजकांची प्राप्तीकर विवरणपत्रे, तसेच लेखापरिक्षित अहवाल (ऑडिट रिपोर्टस्) सादर करण्यासाठीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. आता ही कागदपत्रे 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत सादर केली जाऊ शकतील असा आदेश करविभागाने काढला आहे. यापूर्वी हा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत होता. त्यानंतर तो 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आला होता. आता तो 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आला आहे. तथापि, जे करदाते या वाढीव कालावधीत विवरणपत्र सादर करतील त्यांना प्राप्तीकर कायदा कलम 234 अ प्रमाणे दंड भरावाच लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.