|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » इंग्लंडचा फुटबॉलपटू जॉन टेरी निवृत्त

इंग्लंडचा फुटबॉलपटू जॉन टेरी निवृत्त 

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार तसेच चेल्सीचा फुटबॉलपटू 37 वर्षीय जॉन टेरीने रविवारी येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तब्बल 23 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीला टेरीने निरोप देण्याचे ठरविले आहे.

जॉन टेरीने इंग्लंडच्या फुटबॉल संघाचे 34 सामन्यात नेतृत्व केले आहे. 1995 साली टेरी चेल्सी संघाकडून खेळू लागला. 2003 च्या जूनमध्ये त्याने इंग्लंडकडून फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले. जॉन टेरीने 78 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत तब्बल 19 वर्षे खेळल्यानंतर त्याने 2017 साली चेल्सी संघ सोडला. आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर टेरीने चेल्सी संघाला पाचवेळा प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. इंग्लंडच्या फुटबॉल फेडरेशनने जॉन टेरीला त्याच्या पुढील कालावधीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Related posts: