|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात उद्यापासून घुमणार भगवे वादळ

शहरात उद्यापासून घुमणार भगवे वादळ 

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवप्रति÷ान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही शहरातून भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी दुर्गामाता दौड प्रेरणा देत असते. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या दौडच्या माध्यमातून करण्यात येतो. येत्या बुधवार दि. 10 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबरपर्यंत शहरात भगवे वादळ घेंघावणार आहे.

यावषी दुर्गामाता दौडीचे हे विसावे वर्ष असल्याने ती भव्य दिव्य व जागृती करणारी ठरावी यासाठी शिवप्रति÷ानच्या कार्यकर्त्यांकडून रात्रंदिवस प्रयत्न करण्यात येत आहेत. दुर्गादेवीचा जागर करीत धर्मरक्षणाचे शिवधनुष्य हाती घेत कार्यकर्ते तयार झाले आहेत. यासाठी गल्लोगल्ली बैठका घेण्यात येत आहेत. त्यातून नियोजन करून दौडचे स्वागत करण्यासाठी आकर्षक कमानी उभारल्या जात आहेत.

दुर्गामाता दौड म्हणजे बेळगावकरांसाठी एक धार्मिक पर्वणीच असते. या काळात पहाटे उठून युवक नवदुर्गा, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या नावांचा जयजयकार करीत असतात.

दौडचा मार्ग

बुधवार दि. 10 ऑक्टोबर 2018

श्री शिवाजी उद्यान ते श्री कपिलेश्वर मंदिर

श्री शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्राrनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड क्रॉस नं. 4, क्रॉस नं. 3, क्रॉस नं. 2, संभाजी गल्ली, डॉ. एसपीएम रोड, कपिलेश्वर मंदिर.