|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » ‘गुगल प्लस’ बंद पाच लाख लोकांचा डेटा धोक्यात

‘गुगल प्लस’ बंद पाच लाख लोकांचा डेटा धोक्यात 

ऑनलाईन टीम /  मुंबई

गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय गुगल कंपनीने घेतला आहे. सोमवारी कंपनीने अचानक गुगल प्लसच्या समाप्तीचीच घोषणा करून नेटकऱयांना धक्का दिला. समाजमाध्यमांतील फेसबुक’च्या वाढत्या लोकप्रियतेला तगडा पर्याय म्हणून अमेरिकन कंपनीने सात वर्षांपूर्वी ‘गुगल प्लस’ची निर्मिती केली होती. परंतु लोकांच्या पसंतीची मोहोर उमटवण्यात व्यवस्थापनाला यश आले नाही. गुगलशी संबंधित सर्व कामकाजाकरिता मध्यवर्ती केंद्र म्हणून प्लसला स्थान होते. मात्र गेले काही महिने प्लसचे वेगवेगळे खंड करून ग्राहकांना सेवा देण्यावर भर देण्यात आला होता.एका विशिष्ट बगद्वारे पाच लाख गुगल प्लसच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. गुगल प्लस बंद करण्यापूर्वी हा बग काढून टाकण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे.

गुगल प्लस वापरकरत्यांसाठी हा सुर्यास्त असल्याचे अमेरिकेतील एका दिग्गज इंटरनेट कंपनीने म्हटले आहे. गुगल प्लसची निर्मीती करण्यापासून ते लोकांपर्यंत पोहचवण्यापर्यंत अनेक अव्हानाचा सामना करावा लागला. गुगल प्लसला वापरकर्त्यांच्या अपेक्षेनुरूप तयार करण्यात आले होते. पण हवा तसा गुगल प्लसचा वापर करण्यात येत नव्हता. त्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गूगल कंपनीच्या एका आधिकाऱयाने सांगितले.