दसऱ्याच्या अगोदर Tata मोटर्सची SUV लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई :
टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी SUV कार हेक्साला बाजारात लाँच केलं. कंपनीने दिल्लीच्या एक्स शोरूममध्ये या कारची किंमत 15.27 लाख रुपये इतकी ठेवली आहे. कंपनीने सांगितलं की, हेक्सा एक्सएम प्लसला इलेक्ट्रिक सनरूफसोबत सादर करण्यात आलं आहे. ही प्रीमिअम लूकची गाडी बाजारात महिंद्रा एक्सयूवी 500 ला टक्कर देणार आहे.
या एससूवी हेक्स XM+ मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आहे. यावर कंपनी 2 वर्षांची वॅरंटी देत आहे. ही कार ARIA या प्लॅटफॉर्मवर आधारित असून याचं इंजिन टाटा सफारीसारखं अतिशय ताकदवान आहे. टाटा सफारी स्टॉर्मला कंपनीने जानेवारी 2017 मध्ये लाँच केलं होतं.
Related posts:
Posted in: Automobiles