|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सहजयोगामुळे अडचणींवर मात करता येईल : पवार

सहजयोगामुळे अडचणींवर मात करता येईल : पवार 

वार्ताहर/ खटाव

आज परमेश्वराचे अस्तीत्व शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवी जीवनाच्या माध्यमातून परमेश्वराला जाणता येऊ शकते. सहजयोगामुळे माणूस अनेक अडचणींवर मात करू शकतो, असे प्रतिपादन नितीन पवार यांनी केले.

 खटाव येथे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळ्यात सहजयोग आजचा महायोग या विषयावर ते बोलत होते. यावेळी राहूल पाटील, मनोज देशमुख, जाखणगावचे उपसरपंच जितेंद्र शिंदे, संजय देशमुख, अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेंदूवरचा तणाव ध्यानाने कमी

   नितीन पवार म्हणाले, आत्मा व परमात्मा एकत्र येणे म्हणजे सहजयोग आहे. कर्मकांड केल्याने काहीच साध्य होणार नाही. सहजयोगामुळे मानवी जीवनात परिवर्तन होत आहे. सहजयोगामुळे आत्मसाक्षात्कार होवून आत्मज्ञानी होत येते तसेच व्यसनमुक्त पिढी निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर शेतकरीही उत्तम शेती करू शकतो. मानवी मेंदूवरचा तणाव सहजयोग ध्यानाने नाहीसा होऊन आत्मविश्वास मिळेल.

    प्रास्ताविक करताना उमेश तोगे यांनी जगात एकशे पन्नास सहजयोग केंद्र आहेत. सहजयोगामुळे परमेश्वर व भक्त यांच्यातील अंतर मिटू शकते असे सांगितले. यावेळी खटावमधून माता निर्मला देवी यांच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. तसेच योगसाधनेची प्रात्यक्षिके दाखवून भक्तांकडून करून घेतली गेली. यावेळी मोठय़ा संख्येने भक्त उपस्थित होते. राजेंद्र करळे यांनी आभार मानले.