|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘दाभाळ ते दिल्ली’ विनय तेंडुलकर या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन

‘दाभाळ ते दिल्ली’ विनय तेंडुलकर या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी/ पणजी

गोमंतकीय कुठल्याही क्षेत्रात मागे राहण्याचे कारण म्हणजे गोमंतकीय गोमंतकीयांची प्रशंसा करत नाहीत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे अभिनंदन करत नाही. एकही व्यक्ती परिपूर्ण असूच शकत नाही. प्रत्येकांमध्ये चांगले गुण आणि दोष असतात. खासदार विनय तेंडुलकर हे निस्वार्थी, त्यागी आणि समाजसेवा या परंपरेत मोडणारे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. आजचे राजकारण हे तत्वशून्य आणि निष्ठा नसलेले राजकारण आहे. गोमंतकीयांचा नवीन प्रगतशील समाज घडविण्यासाठी खासदार विनय तेंडुलकर राजकारणात आले असे उद्गार पद्मश्री सुरेश आमोणकर यांनी काढले.

‘दाभाळ ते दिल्ली’ विनय तेंडुलकर या चरित्रात्मक पुस्तक प्रकाशनसोळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माजी मंत्री निर्मला सावंत, खासदार विनय तेंडुलकर यांच्या पत्नी विभा तेंडुलकर, पुस्तकाचे लेखक संजीव वेरेंकार, आनंद वाघुर्मेकार, कांता गावडे, प्रवीण कुंकळकर इ. उपस्थित होते.

याप्रसंगी माजी मंत्री निर्मला सावंत म्हणाल्या की, या पुस्तकाचे लेखक संजीव वेरेंकार यांनी सरळ साधी उघवती भाषा वापरली आहे. तेंडुलकर यांचे नेतृत्व, व्यक्तीमत्व यामध्ये आहे तसेच त्यांनी कष्ट करुन जे यश प्राप्त केले त्याबद्दलचा प्रवासही यामध्ये आहे. अशाप्रकारचा आदर्श समाजासमोर येणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.

खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले की, या पुस्तकांमध्ये जे लिहिले आहे ते शंभर टक्के खरे आहे. लहान असताना संघाच्या शाखेतून घडत गेलो. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भजपमधील नेत्यांनी मार्गदर्शन केले. पक्षासाठी आपण मंत्रीपदाचा राजीनामामही दिले असेही ते म्हणाले.

संजीव वेरेंकार यांनी सांगितले की यामध्ये कुठेच तेंडुलकर यांनी एकही शब्द काढून टाक असे सांगितले नाही.

Related posts: